अनाथ हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहीत आहे , ज्याला कोणीच नाही तो अनाथ,ज्याला आपल्यांनी सोडले असा अनाथ.अनाथ किंवा निराधार म्हणा एकच .मग तो व्यक्ती असो वा प्राणी.

 जेव्हा आपलीच माणसं आपल्याला सोडून देतात तेव्हा काय ,कसं वाटत असेल हे न विचार केलेलच बर.मग अनाथाश्रम  निराधारांनासाठी  आधार बनतात. तुम्ही कधी निराधार ,अनाथ प्राण्यांना बघितलंय का?

 प्रश्न थोडा विचित्र वाटला ना? निराधार,अनाथ प्राण्यांना आपण मोकाट सुटलेली गुर, रस्त्यावरची कुत्री ,मांजर असे संबोधततो ना ! ते पाळीव प्राणी आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते रस्त्यावर कसे आले? जंगलातून ? की कोणाच्या घरातून ?


जस एखाद्या माणसाला घरातून बाहेर काढलं जाते त्याच्यापेक्षा विदारक रित्या एका प्राण्याला घरातून बाहेर रस्त्यावर टाकले जाते.आणि मग आपण ओरडतो रस्त्यावर कुत्रे खूप झाले, मांजरी वाढलीत, गुरे फिरतायत .पण त्यात त्यांची काय चूक?

 आपणच त्यांना घरा बाहेर टाकतो ,काढतो  त्या बिचाऱ्या  घर नाही, खायला नाही मग काय स्थिती असेल?

 आणि हे करण्यामागचा हेतू म्हणजे आजकाल आपल्याला पर्शियन मांजर , कुत्रे, hybrid गाई, म्हैशी हव्या झाल्यात. लाखो रुपये खर्च करून अश्या प्राण्यांना खरेदी केली जाते मग त्याच्यासाठी स्पेशल फूड स्पेशल, सोप,...इत्यादी खूप मोठी लिस्ट होईल.. हो आवड असते एखाद्याला त्यांनी नक्कीच घ्यायला हरकतच नाही पण म्हणून घरात असलेल्या प्राण्यांना बाहेर काढून रस्त्यावर सोडून किती योग्य?

जी कुत्री ,मांजर तुम्ही जे खाता ते खाऊन तुमच्या सोबत राहू शकतात त्यांना सोडून आपण फोरेन कल्चर कडे जातोय..   ते बोलण्यापेक्षा सोबत घेवून पुढे गेलो तर जास्त चांगले नाही का!!

आपण कधी असा विचार करतो की दुकानातून मांजरे कुत्रे विकत आणण्यापेक्षा रस्त्यावरच्या एखाद्याला सांभाळू ...किंवा आपल्या घरातल्या प्राण्याला रस्त्यावर टाकण्यापेक्षा एखाद्या काजळी घेणार्या व्यक्ती कडे देण चांगले नाही का? 

रस्त्यावर प्राण्यांची संख्या वाढली की मग आपण त्यांचा त्रास होतो म्हणून ओरड करतो.   पण त्यात त्यांनचा काय दोष..? बिचारे रस्त्यावर फिरत असतात भूक भागवण्यासाठी अन्न शोधत..त्यातच एखादी अंगावरुन जाते आणि संपत आयुष्य..  काही NGO's ची माणसं, काही प्राणी प्रेमी सुध्दा अश्या प्राण्यांना आधार देतात पण कशी वेळी का आणायची . घरातला प्राणी तुम्हाला नको झाला तर एखाद्या गरिबला,प्राण्यांची आवड असणार्या माणसाकडे द्यावा पण त्याला रस्त्यावर टाकू नका.

कोणताही प्राणी असो वा पक्षी ,पाळीव असो वा रानटी,कोणीही असो हे सगळे निस्वार्थ प्रेम करणारे असतात.त्यांना फक्त पोटभर खायला मिळालं की खूप होत.

आज २१ व्या शतकात आपली पिढी फक्त रंग,रूप ह्याच गोष्टीला आकर्षित होतेय फक्त आपण विसरतोय रंग ,रूप हा फक्त दिखावा असतो आणि देवाची देण पण असते. ह्या जगात आपल कोण?,आपण आज जे काही आहोत ते कोणामुळे ह्याच गोष्टीचा विसर आपल्याला पडत चाललाय... जिथे आई वडीलांना घराबाहेर काढलं जात तिथे प्राण्यांच काय..

मनाचं सौंदर्य आपुलकीने, प्रेमाने बघा जग खूप सुंदर आहे.






Comments

  1. खूप छान श्रेया 👌👍 तुझे विचार छान शब्दात वक्त केलास खूप छान...

    ReplyDelete
  2. Very nice 👍👌👌and very true👍
    Keep it up 🙌

    ReplyDelete
  3. खूप छान श्रेया 👌😍

    ReplyDelete
  4. सत्य आणि हृदयस्पर्शी लिहिलस...खूप सुंदर.👌👌💯💯

    ReplyDelete
  5. So heartouching yarr💯nicely written....🖤

    ReplyDelete

Post a Comment