अनाथ हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहीत आहे , ज्याला कोणीच नाही तो अनाथ,ज्याला आपल्यांनी सोडले असा अनाथ.अनाथ किंवा निराधार म्हणा एकच .मग तो व्यक्ती असो वा प्राणी. जेव्हा आपलीच माणसं आपल्याला सोडून देतात तेव्हा काय ,कसं वाटत असेल हे न विचार केलेलच बर.मग अनाथाश्रम निराधारांनासाठी आधार बनतात. तुम्ही कधी निराधार ,अनाथ प्राण्यांना बघितलंय का? प्रश्न थोडा विचित्र वाटला ना? निराधार,अनाथ प्राण्यांना आपण मोकाट सुटलेली गुर, रस्त्यावरची कुत्री ,मांजर असे संबोधततो ना ! ते पाळीव प्राणी आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते रस्त्यावर कसे आले? जंगलातून ? की कोणाच्या घरातून ? जस एखाद्या माणसाला घरातून बाहेर काढलं जाते त्याच्यापेक्षा विदारक रित्या एका प्राण्याला घरातून बाहेर रस्त्यावर टाकले जाते.आणि मग आपण ओरडतो रस्त्यावर कुत्रे खूप झाले, मांजरी वाढलीत, गुरे फिरतायत .पण त्यात त्यांची काय चूक? आपणच त्यांना घरा बाहेर टाकतो ,काढतो त्या बिचाऱ्या घर नाही, खायला नाही मग काय स्थिती असेल? आणि हे करण्यामागचा हेतू म्हणजे आजकाल आपल्याला पर्शियन मांजर , कुत्रे, hyb...